फडणवीसांच्या गाडीचे स्टेअरिंग एकनाथ शिंदेंच्या हातात : अजित पवार म्हणाले - 'गार गार वाटतय'

Kolhapur news
By -

 

                  




   नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर या मार्गावरील बोगद्यातून या तिन्ही नेत्यांनी प्रवास केला. विशेष म्हणजे या वेळी देवेंद्र फडणवीस यांची गाडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवली. या आधी मागील वेळी झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांची गाडी देवेंद्र फडणवीस यांनी चालवली होती, हे विशेष.


अजित पवार यांचा वेगळ्या गाडीतून प्रवास


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीत प्रवास केला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र वेगळ्या गाडीतून या मार्गावरून जाताना दिसले. त्यामुळे याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. सरकार म्हणून आम्ही एकत्र काम करत आहोत. एकत्र निर्णय घेतले जात आहेत. हेलिकॉप्टरमध्ये देखील या तिघांनी एकत्र प्रवास केला. राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या नेत्याने आपल्या गाडीत बसावे, अशी इच्छा असते. त्यानुसार अजित पवार हे वेगळ्या गाडीत बसले होते. त्यात चर्चा करण्यासाठी काहीही नसल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे.


    अजित पवार म्हणाले - 'गार गार वाटतय'


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ड्रायव्हिंग केले. यावर पत्रकारांनी अजित पवार यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी एका शब्दात 'गार गार वाटतय' असे उत्तर दिले. अजित पवार यांच्या या मिश्किल टिपण्णी मुळे सर्वांमध्ये हशा पिकला होता. मात्र महायुतीमधील नेते एकत्रित समृद्धी महामार्ग वरील प्रवासाचा आनंद लुटताना दिसले.


                ----------------------