कोल्हापूर न्यूज नेटवर्क
वरीष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाला वेळेत पोहचण्याच्या घाईमुळे चिपळूण ते रत्नागिरी जाणाऱ्या शिक्षकांच्या मिनी बसचा मोठा अपघात झाला त्यात अनेक प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू .भगिनी गंभीर जखमी झाले .
यास "एक दिवस जरी प्रशिक्षणाला गैरहजर राहिलात किंवा हजेरी ॲानलाईन अपलोड केल्यानंतर पोहचलात तर संपूर्ण प्रशिक्षणातून बाद करण्याच्या संचालकांच्या फतवा कारणीभूत आहे . त्यामुळे SCERT चे संचालक मा . राहूल रेखावार यांच्यावर या अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल कराव अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथ शिक्षक सेवक समितीचे अध्यक्ष भरत रसाळे यांनी केली आहे .
प्रत्येक तासाला ऑनलाईन हजेरी व त्यात सही नसेल तर प्रशिक्षणातून Leave करण्याच्या SCERT चे संचालक मा राहूल रेखावार यांनी सूचना दिल्या . त्यांच्या या फतव्यामुळे प्रशिक्षणस्थळी वेळेत पोहण्याच्या घाईमुळे आजचा मिनी बसचा मोठा अपघात झाला . यात अनेक प्रशिक्षणार्थी त्यात गंभीर जखमी झाले आहेत
यास केवळ SCERT चे संचालक मा .राहूल रेखावार ह्यांचा हेकेखोरपणा कारणीभूत आहेत आणि त्यांना पाठिशी घलणारे शिक्षण मंत्री नाम . दादा भुसे यांचे बोटचेपे धोरण कारणीभूत आहे . त्यामुळे या घटनेचे आम्ही जाहिर निषेध करतो .
अनेक संघटनांनी मागणी करून सुद्धा अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित केलेला नाही .तर त्यांना या प्रशिक्षणांतून Leave करून परत पाठवले आहे . त्यामुळे या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या गुन्हा मा . संचालक राहूल रेखावार यांच्यावर दाखल करावा . अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथ .शिक्षक सेवक समितीच्या वतीने समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी. केली आहे .
-------------------