श्री ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडीचे वारकरी झाले भजन कीर्तनात दंग

Kolhapur news
By -

 

          


     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


           "चालला गजर, झाहलो अधीर, लागली नजर कळसाला, पंचप्राण हे तल्लीन, आता पाहीन पांडुरंगाला" असा विठू नामाचा जयघोष करीत  चिखलीतील श्री ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी सोहळा  पंढरपूर कडे प्रस्थान करीत आहे. वाटंबरे येथे मुक्कामी असताना सांगली येथील गायकांच्या भजन कीर्तनाने वारकऱ्यांची रात्र कधी संपली हे कळालेच नाही. वाटंबरेचे भगत सर यांच्या घरी हा कार्यक्रम झाला. 


         जयश्री जाधव , स्वाती जाधव ,वैश्ववी जाधव  या गायकाने सुंदर भजने सादर केली . महिलांच्या ओवी गायनाने कार्यक्रमाची रंगत खूपच वाढली. भजन गायनामध्ये वारकरी दंग झाले होते. महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.