कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर लालबागच्या राजाची कीर्ती. पसरली आहे. लाखो भाविक तासनतास रांगेत उभे राहून दर्शन घेतात.अशा या मुंबईच्या लालबागच्या राजाचे गणेशोत्सवात पौरोहित्य करण्याचा मान कोल्हापूरच्या सुपुत्राला आहे असे सांगितले तर विश्वास बसणार नाही.या सुपुत्राचे नाव आहे अरविंद शामराव वेदांते.
एक दोन नव्हे तर १९८० पासून म्हणजे गेली ४४ वर्षे ते लालबागच्या राजाचे दरवर्षी पौरोहित्य करत आले आहेत.लालबागच्या राजाचे जे विश्वस्त आहेत त्यांचाही अरविंद वेदांते यांच्यावर गाढा विश्वास आहे. पहिल्या दिवशी गणेशाची प्रतिष्ठापना झाली की विसर्जनापर्यंत १० दिवस अरविंद वेदांते हेच पूजा अर्चा ,आरती व पूजेचे सर्व विधी करत असतात.त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यांची पौरोहीत्य परंपरा आहे.
पूजाविधीचे संपूर्ण ज्ञान ,श्लोक , मंत्र , स्वच्छ आणि स्पष्ट बिनचूक मंत्रोच्चार हे त्यांच्या पूजेचे वैशिष्ट्य असते. सकाळी साडे पाचला ते गणेशाची पूजा सुरू करतात.पुन्हा सायंकाळी आठ वाजता पूजा करावी लागते.
लाल बागच्या गणपतीच्या दर्शनासाठी आख्या महाराष्ट्रातून भाविक येत असतात.बॉलिवूडच्या सेलिब्रेटी पासून ते आमदार,नामदार मंत्री सुध्दा दर्शनासाठी येत असतात.अनेक भक्त नवस बोलतात.हा गणपती नवसाला पावतो अशीही भाविकांची श्रद्धा आहे.
एवढ्या मोठ्या मानाच्या गणपतीचे पौरोहित्य करण्याचा मान कोल्हापूरच्या सुपुत्राला मिळाला ही अभिमानाची गोष्ट आहे.त्यांची एक मुलगी मुरगूडला दिली आहे .त्यामुळे ते मुरगूड करांचे व्याही आहेत.
कोल्हापूरचे नाव देशभरात अनेक बाबींनी प्रसिद्ध आहे.कोल्हापुरी चपला,कोल्हापुरी मिसळ,वडापाव,विश्वास इंजिन,सोन्या चांदीचे दागिने,कोल्हापुरी गूळ, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ,मराठी चित्रपट सृष्टीचे माहेर ,शिरायांच्या स्वराज्याची महाराणी ताराराणी यांनी बसवलेली दुसरी राजधानी.आंतरराष्ट्रीय कुस्तीचे प्रणेते शाहू महाराज इत्यादींनी ही नागरी लौकिक पात्र आहे.
लालबागच्या राजाची गणेशोत्सवातील मानाची पूजा सुद्धा कोल्हापूरच्या सुपुत्राकडे आहे ही खरोखर कोल्हापूरकरांना अभिमानाची गोष्ट आहे.
------------------------