मुंबई : "मी तुझ्यावर प्रेम करतो' असे म्हणणे ही केवळ भावनांची अभिव्यक्ती आहे. असे करणे म्हणजे लैंगिक छळ होत नाही किंवा त्यामागे तसा हेतू दिसून येत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने २०१५ मध्ये एका किशोरवयीन मुलीचा छळ केल्याच्या आरोपातून ३५ वर्षीय आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.
न्यायाधीश उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोणत्याही लैंगिक कृत्यांमध्ये अनुचित स्पर्श, जबरदस्तीने कपडे उतरवणे, अश्लील हावभाव किंवा महिलेच्या विनम्रतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने केलेली टिप्पणी यांचा समावेश आहे. मात्र, हा खटला छेडछाड किंवा लैंगिक छळाच्या कक्षेत येत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
............................