४ जेआर ह्युमन राईटस् केअर ऑर्गनायझेशन मानव अधिकार संघटनेच्या तिसऱ्या वर्षातील नुतन पदाधिकाऱ्यांची निवड ओळखपत्र आयडेंटिटी कार्ड वाटप व संघटनेचे पद -नियुक्ती पत्रांचे वाटत करण्यात आले.
मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने गरीब, पिढीत, वंचित, नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता,अन्याय अत्याचार भ्रष्टाचार च्या विरोधात काम करण्यासाठी व तसेच भारताच्या कायद्याअंतर्गत मानवाधिकारच्या रक्षणेसाठी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या निपाणी मध्ये सामान्य माणसांच्या मानवधिकारासाठी शासन दरबारी निवेदने, देऊन संघटनेच्या,माध्यमातून कार्य सुरू आहे.
केंद्रीय मानव अधिकार संघटना देशभरात कार्यरत आहे.याची व्याप्ती वाढवण्यासाठी आत्ता प्रत्येक राज्यात अशी संघटना कार्यरत झाली आहे.आत्ता नव्या जोमाने या कार्याला सुरुवात करण्यासाठी
आय.बी.ऑफिस निपाणी येथे ४ जेआर ह्युमन राईटस् केअर ऑर्गनायझेशन -मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने आजपर्यंत निस्वार्थपणे सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमानंतर नूतन पदाधिकाऱ्यांना संघटने कडून नियुक्ती पत्र ,ओळख कार्ड व पुष्पगुच्छ देऊन नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी संघटनेचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.
----------------------