( सागरी सुरक्षा रक्षक व पोलिसांच्या समवेत अपघातामधून बचावलेली महिला )
मुंबई : गुगल मॅपमुळे नवी मुंबईत मोठा अपघात झाला. शुक्रवारी रात्री उशिरा नवी मुंबईतील बेलापूर परिसरात एका महिलेची कार थेट खाडीत कोसळली. ती महिला गुगल मॅपवर अवलंबून राहून कार चालवत होती.
सुदैवाने, तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी सतर्कता दाखवली आणि महिलेचा जीव वाचला. नंतर, क्रेनच्या मदतीने बेलापूर खाडीतून गाडी बाहेर काढण्यात आली. गुगल मॅपमुळे अपघात होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशा दुर्घटना घडल्या आहेत.
----------------------