मालेगाव बॉम्ब स्फोट खटला.सर्व आरोपी निर्दोष : आतंकवादाला धर्म नसतो. रंगही नसतो.

Kolhapur news
By -

 

          


         कोल्हापूर न्यूज  / वि .रा.भोसले


   मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष सुटले.१७ वर्षानंतर न्याय मिळाला.आरोपी मध्ये साध्वी प्रज्ञा,कर्नल पुरोहित सह ७आरोपी निर्दोष सुटले.

    १७ वर्षापूर्वी काँग्रेस चे तत्कालीन मंत्री चिदंबरम यांनी याला हिंदू आतंकवाद असे म्हटले.त्यानंतर काँग्रेसचेच नेते दिग्विजय सिंग यांनी त्याला भगवा आतंकवाद म्हटले.हे दोघेही अत्यंत चुकीचे बोलले.धर्माशी आणि रंगाशी संबंध जोडणे हे हिंदुविरोधी राजकारण होते असे त्यावेळी हिंदु संघटनांनी म्हंटले होते.पण लक्षात कोण घेतो.थोडे मागे जाऊ.१९९३ ला मुंबईत जे बॉम्ब  स्फोट झाले त्यावेळी काँग्रेस मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. दाऊद चा थेट संबंध असूनही कोणी त्याला हिरवा आतंकवाद असे म्हंटले नाही. 


     त्यावेळी शेकडो निष्पाप लोक मारले गेले. मृतांमध्ये मुस्लिम होते,हिंदू,होते, ख्रिश्चन होते.२६/११ च्या हल्ल्यात सुद्धा शेकडो निरपराध लोक मारले गेले.त्यावेळी ही मृतांमध्ये हिंदू,मुस्लिम, ख्रिश्चन सगळे होते.दहशतवादी पाकिस्तान मधून आले होते.त्याही हल्ल्याला हिरवा दहशत वाद कोणीही म्हंटले नाही.२२/४ ला पहेलगाम मध्ये २६ निष्पाप पर्यटक मारले गेले.तरीही हिरवा दहशतवाद असे कोणी म्हटले नाही.दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिन्दुर मध्ये चोख उत्तर देण्यात आले.ऑपरेशन सिंदूरचे समर्थन करण्यासाठी ओवेसी सारखे मुस्लिम नेते जगभर फिरून आले.


    दहशत वादाला कोणताही धर्म किंवा रंग नसतो.मालेगाव मध्ये रमझान आणि नवरात्र असे दोन्ही सुरू असताना स्फोट झाले.मध्यंतरी रेल्वेत सुद्धा स्फोट झाले.तेही निर्दोष सुटले. तेथे ना धर्म होता ना रंग.धर्म किंवा रंग यांचे राजकारण कोणत्याही पक्षाने करता कामा नये. एक गोष्ट मात्र नक्की की भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या इतिहासात हिंदूंच्या कोणत्याही संघटनांनी हिंसाचार केलेला नाही. या उलट अतिरेक्यांनी काश्मिरी पंडितापासून ते परवाच्या पर्यटकांपर्यंत हजारो निरपराध लोकांचे बळी घेतले. त्यांना ही धर्माचे लेबल लावणे चुकीचे ठरेल.

 असे का ?

ज्या पाकिस्तान मधून ते आले त्या पाकिस्तानच्या लोकसंख्येहून अधिक मुस्लिम  लोक भारतात राहतात .ते येथे पूर्ण सुरक्षित आहेत.मग अशा घटना का घडतात.नैराश्य, हताशपणा, यातून निर्माण झालेल्या द्वेष व मत्सर या भावना  अतिरेक्यांच्या मनावर बिंबविल्या जातात.मृत्यू डोक्यावर घेऊन कसाब सारखे युवक दहशत वाद माजवतात.त्यातून त्यांना मृत्यू शिवाय काहीही मिळत नाही.तिकडे मात्र त्यांना हुतात्मा म्हणतात.सगळं विचित्र आहे.आतंकवाद किंवा दहशत वाद हे विकृतपणाचे कुरूप (Ugly) चेहरे असतात असे दर्शनिकांनी म्हंटले आहे .

  आतंकवादाला धर्म आणि रंग जोडणे गैर आहे.


       --------------------------