संत बाळूमामांच्या सेवेत असणाऱ्या सर्जेराव भाट यांचा देवालयामार्फत सत्कार.

Kolhapur news
By -

 

                          



        कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


  मुरगूडचे सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट यांनी श्री संत बाळूमामांच्या सेवेत सातत्याने दिलेल्या योगदानाबद्दल देवालयाच्या व्यवस्थापन मंडळा मार्फत त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे,अध्यक्ष धैर्यशील भोसले,सरपंच विजय गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.


  होडगे यांनी आपल्या मनोगतात सर्जेराव भाट यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रत्येक अमावस्येला होणाऱ्या वाहनांची गर्दी व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याचे मोठे दडपण पोलिस व व्यवस्थापनावर असते.याकामी स्वयंसेवी कार्यकर्त्यांची सुध्दा गरज भासते.भाट यांनी अशा स्वयसेवकांचे नियोजन करण्यात पुढाकार घेतला.


याशिवाय देवस्थानचे अन्न दान कार्यक्रम,हरिनाम सप्ताह ,बकऱ्यांच्या १८ कळपांचे कारभारी (बगगे) यांचेशी संपर्क करणे,लांबून येणाऱ्या भाविकांच्या दिंड्यांचे नियोजन करणे ,तसेच नित्य सेवेतील त्यांचे मोलाचे योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


   मुरगूड येथील बाळूमामा भक्त मंडळात सुध्दा ते सक्रिय असतात.तेथील , स्वच्छता अभियान,वृक्षारोपण, तलाव स्वच्छता,महापुरातील कार्य,पिण्याच्या पाण्याची समस्या,आणि विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात  अनेक शिवभक्तांना बरोबर घेऊन ते काम करत आले असल्याचे गुरव यांनी सांगितले.शहरातील. अवैध व्यवसाया बद्दल.पोलिस व्यवस्थापनाला जागृत करण्याचे कार्य सुध्दा शिवभक्तांनी भाट यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी केले आहे.


   ही निरपेक्ष समाजसेवा स्वयंसेवक प्रसिध्दी व फोटो साठी  करतात अशी टीकाही कांहीं विरोधकांनी केली.त्या टीकेला त्यांनी विनयाने उत्तर दिले .हे कार्य तुम्हीं सुध्दा करू शकता असे टीकाकारांना त्यांनी सुनावले. बाळूमामा देवस्थानने दिलेल्या सन्मानाचे स्वागत करतांना त्यांनी सांगितले की सन्मान मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना अर्पण करतो.


       -----------------------------