श्री बीरेश्वर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सामाजिक बांधिलकी

Kolhapur news
By -

             


          काेल्हापूर न्यूज/हेरले प्रतिनिधी


हेरले (ता.हातकणंगले) येथे श्री बीरेश्वर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एकसंबा शाखा हेरले यांच्या वतीने सभासद मरणोत्तर निधी वितरण करण्यात आले.रोहिणी क्रांतिवीर शिगावकर यांचे पती क्रांतिवीर शिगावकर यांचे निधन झाले. त्यांच्या मरणोत्तर त्यांचे वारस रोहिणी शिगावकर यांना ३० हजार रूपयांची आर्थिक मद्त संचालक ऋषभ जैन यांचे हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.


     यावेळी  हेरले शाखा चेअरमन राहुल माळी,  व्हॉ. चेअरमन नारायण खांडेकर, संचालक निलेश कोळेकर, डॉ. आर. डी. पाटील, जिनगोंडा पाटील व इतर सभासद  सुरज पाटील व शाखा कर्मचारी उपस्थित होते. 


निधी मंजूर केल्या बद्दल संस्थापक माजी खासदार  अण्णासाहेब जोल्लेजी, सहसंस्थापिका आमदार शशिकला अण्णासाहेब जोल्लेजी, मुख्य शाखेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व मुख्य शाखेचे अधिकारीवर्ग यांचे मार्गदर्शन लाभले. 

       

    हेरले  : येथे बिरेश्वर क्रेडिट सोसायटी येथे सभासद मरणोत्तर निधि वितरण करत असताना संचालक ऋषभ जैन व  शाखा चेअरमन राहुल माळी व्हॉ. चेअरमन नारायण खांडेकर व संचालक आदी मान्यवर


         -------------