मंडलिक गटा मार्फत एक लाखाची दही हंडी १७ ऑगस्टला फुटणार.

Kolhapur news
By -

 

                     


 

       कोल्हापूर न्यूज नेटवर्क  

 

मुरगुड येथील मंडलिक गट व शिवसेनेमार्फ (शिंदे) मार्फत दिनांक  १७ ऑगस्ट रोजी एक लाखाची दही हंडी फोडण्यात येणार आहे . माजी खासदार संजय  प्रा. संजय मंडलिक व पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांच्या पुढाकाराने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.


    येथील मराठी शाळेच्या पटांगणावर सायंकाळी चार वाजता हा थरार पहावयास मिळेल असे आयोजकांच्या मार्फत सांगण्यात आले.या कार्यक्रमासाठी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार जयश्री जाधव, सत्यजित कदम, सारंगधर देशमुख ,सुजित चव्हाण तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


    विजेत्या संघाला एक लाखाचे बक्षीस देण्यात येईल तसेच सलामीचे सहा थर यशस्वीपणे लावणाऱ्या गोविंदा पथकास ११हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.


   सार्थ सागर फाउंडेशन ने स्पर्धेचे नियोजन हाती घेतले असून गोविंदांच्या सुरक्षेसाठी समीट ॲडवेंचर्स विल रायडर्स ॲडवेंचर्स याची पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत. मुरगूड नगर परिषद व ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फत रुग्णवाहिकेची सोय करण्यात येईल. डॉक्टरांची पथके आता तैनात असतील. सर्व गोविंदांना दहा लाख रुपयाचे विमा कवच असणार आहे.


    या चित्त थरारक दहीहंडी कार्यक्रमा रिल्स स्पर्धांचे आयोजन केले आहे . रेसच्या पहिल्या तीन क्रमांकाना पाच हजार ,तीन हजार व दोन हजार अशी बक्षीसे आहेत.


                 -----------------------