कोल्हापूर न्यूज नेटवर्क
देशाच्या नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम ,देशाभिमान व राष्ट्र प्रथम या भावना जागृत व्हाव्यात म्हणून भारत सरकारने मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी हर घर तिरंगा रॅली अभियान राबवण्याचे नागरिकांना तथा स्थानिक स्वराज्य संस्थांना आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार मुरगूड नगरपरिषदेच्या वतीने या अभियानाला उत्फूर्त प्रतिसाद देण्यात आला व भव्य दुचाकी रॅली तिरंगा ध्वजासह काढण्यात आली.या रॅलीत नगरपरिषदेचे कर्मचारी व अन्य युवक युवती सामील झाले होते. नगरपालिकेपासून निघालेली ही रॅली बाजार पेठ,सर पिराजी मार्ग,पोलिस ठाणे, हुतात्मा तुकारामचौक,गावभाग,गाव तलाव, ज्ञानेश्वर कॉलनी, पाटील नगर,एस टी बस स्थानक मार्गे शिवतीर्थावर आली.
नागरिकांनी रॅली चे उत्स्फूर्त स्वागत केले.जागोजागी भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या. उद्या कांहीं युवक मंडळे रॅली काढणार असल्याचे ही समजले.
-------------------------