इंदापूर : सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, पुढच्या आठ दिवसात किंवा महिनाभरात मला एखादे पद मिळाले तर तालुक्यातील जो 10 टक्के वर्ग मला सोडून गेला, तो पटापट माघारी फिरेल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच काल काय झाले याचा विचार कधीच केला नाही, उद्या काय करायचे ते पाहू, असेही हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, माझ्या कार्यकर्त्यांचे आणि माझे नाते काही पदापुरते नाही. एक दहा टक्के वर्ग असा आहे जो सोडून गेला. पुढच्या आठ दिवसात, महिन्याभरात मला जर पद मिळाले तर ते पटापटा येतील आपल्याकडे. मग निष्ठावंताना ते बाजूला सारण्याचा प्रयत्न करतात. पण मी वाटच बघतोय अशी लोक कधी माझ्याकडे परत येणार ते. मला पण राजकारणात चाळीस वर्षे झाली आहेत. परिस्थिती बदलते, चिंता कधीच करायची नाही. काल काय झाले त्याचा विचार कधीही दर्षवर्धन पाटलाने केला नाही .
-------------------