कोल्हापूर न्यूज नेटवर्क
भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने देशभरात 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा कागल तालुका मुरगुड मंडल यांच्या वतीने मुरगुड शहर येथे तिरंगा रॅली काढण्यात आली. भाजपाचे जिल्हाअध्यक्ष नाथाजी पाटील व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली हि रॅली काढण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मुरगुड परिसरातील नागरिक यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या तिरंगा रॅलीची सुरूवात मुरगुड नाका नं.१ पासून झाली. यावेळी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांसह देशभक्तीपर गाणी व घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण आणि नव्या पिढीला देशसेवेची प्रेरणा देणे हा या रॅलीचा उद्देश असल्याचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी सांगितले.
यावेळी तालुका अध्यक्ष ॲड .अमर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. मुरगुड शहरात बाजारपेठ मार्गावरून फेरी काढत राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देण्यात आला. शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमास भाजप जिल्हा चिटणीस तानाजी कुरणे, बिद्रीचे संचालक रणजीत मुडूकशिवाले, मयुर सावर्डेकर, धनंजय पाटील, सतीश लोंढे, शिवाजी कोळके, लखन गोधडे, अमित ठाणेकर, प्रमोद मांगले, इतर मान्यवर व विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
------------