१७ कोटी मुलांचे MBU वेळेत पूर्ण करण्याच्या देशभरातील शाळांना सूचना

Kolhapur news
By -


         


नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण  (UIDAI) ने देशभरातील शाळांना सूचना दिल्या आहेत की, ५ ते १५ वयोगटातील मुलांचे आधार अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) वेळेत पूर्ण करावे.


 UIDAI चे CEO भुवनेश कुमार यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून MBU शिबिरे आयोजित करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानुसार, UIDAI व शिक्षण मंत्रालयाने मिळून UDISE+ प्लॅटफॉर्म (Unified District Information System for Education Plus) वरून सुमारे १७ कोटी मुलांचे प्रलंबित MBU पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.


UDISE+ ही शालेय शिक्षणाशी संबंधित आकडेवारी गोळा करणारी शैक्षणिक व्यवस्थापन माहिती प्रणाली आहे.या उपक्रमामुळे मुलांचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे अधिक सोपे आणि सुलभ होणार आहे.


                   ------------------