कोल्हापूर न्यूज नेटवर्क
राहुल गांधी आणि तेजस्वी यादव मिळून बिहार मध्ये निवडणूक आयुक्त व केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत.जागोजागी रॅली काढत आहेत.हातात एक छोटे हिरवट रंगाचे पुस्तक असते .देशाचे संविधान म्हणून ते पुस्तक दाखवत असतात.व्होट चोर मोदी चोर अशा घोषणा देतात.काँग्रेस चे झेंडे घेतलेले कांहीं समर्थक त्यांच्या बरोबर तशाच घोषणा देतात.
राहुल गांधी यांना आंदोलन करण्याचा आणि भाषण करण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे.म्हणून काय पंतप्रधान यांना व्यासपिठावरून अपशब्द वापरणे,त्यांना चोर म्हणणे हे कितपत योग्य आहे.राहुल गांधी हे खासदार असून संसदेत विरोधीपक्ष नेते आहेत.त्यांनी तरी असवैधानिक भाषा वापरायला नको होती.भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे.
पंतप्रधान हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले साऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतात.अनेक राष्ट्रांचा ते दौरा करतात.तेथेही ते १४० कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून वावरतात.अनेक देशांनी त्यांना रेड कार्पेट सन्मान दिला आहे.देशभरातून रोड शो मध्ये त्यांच्यावर पुष्पवृष्टी देखील झाली आहे.
इतके सन्माननीय पद असताना राहुल गांधी त्यांना जाहीरपणे शिवराळ भाषा वापरतात हे निश्चितच निंदनीय आहे. गल्लीतल्या पोरांच्या भांडणात वापरतात असे शब्द संसदेतील विरोधी पक्ष नेत्याने वापरावेत हे पोराटकी सारखेच आहे. राहुल गांधी यांची अपरिपक्वता तर दिसून येतेच शिवाय एक प्रकारचे मानसिक हताशपण सुध्दा दिसून येते.असे नेते लोकशाहीला आणि देशाचे नेतृत्व करण्यास सुद्धा पात्र नाहीत असे परखड विचार काहींनी मांडले आहेत.
निवडणूक आयोगाने सर्व पुरावे सादर केले आहेत तरीही राहुल गांधी शपथ पत्र द्यायला तयार नाहीत.याचा अर्थ त्यांना केवळ पंतप्रधानांची बदनामी करायची आहे हे सिद्ध होते. योग्य त्या प्रकारे विरोध करणे हा प्रत्येकाचा हक्क असतो पण जाणून बुजून बदनामी करणे हा गुन्हा ठरतो. त्यामुळे बिहारचे राहुल आंदोलन देखील बदनाम होत आहे.
----------------------

