अमरनाथ यात्रेचे भावविभोर दर्शन : दररोज लागते दहा टन बर्फ

Kolhapur news
By -

 


                 


          कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     घरगुती गणेशाच्या मूर्ती २ सप्टेंबर ला विसर्जित झाल्या.त्यानंतर लगेच सार्वजनिक मंडळाच्या गणपती चे देखावे सुरू झाले. सामाजिक , धार्मिक आणि राष्ट्रीय विषयावर सुंदर सुंदर देखावे पहायला मिळतात.हे देखावे पाहण्यासाठी संध्याकाळच्या वेळी गणेश भक्तांची अलोट गर्दी  होत आहे.


  बाजारपेठेतील नवमहाराष्ट्र गणेश मंडळाने अमरनाथ येथील बर्फाच्या शिवलिंगाचा देखावा तयार केला आहे.या शिवलिंगाच्या प्रत्यक्षात दर्शनासाठी  १५ ते१६ किलोमीटर अंतर चालत जावे लागते.त्यासाठी बर्फाळ पहाड पार करावे लागतात.कांहीं श्रीमंत भक्त हेलिकॉप्टरने देखील जातात.हिमालयातील अत्यंत अवघड अशा या शिवलिंग दर्शनाचा अद्भुत देखावा या मंडळाने सादर केला आहे.रोज दहा टन बर्फ यासाठी लागते.


 सीमेवरील आपले जवान अशाच बर्फात रात्रंदिवस पहारा देत असतात.अमरनाथ च्या धार्मिक यात्रेवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी मागे एकदा  हल्लाही केला होता. अशा विकृत मनोवृत्तीच्या नराधमांच्या भ्याड हल्ल्यांना न जुमानता व न डगमगता शिवभक्त अमरनाथाची यात्रा करतात. नवमहाराष्ट्र मंडळाच्या या देखाव्यामुळे प्रेक्षक भारावून जातात.शिवलिंगाच्या वरील बाजूस भगवान शंकराची अत्यंत रेखीव मूर्ती सुध्दा स्थापित करण्यात आली आहे.मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते प्रेक्षकांना माहिती देतात.




      ै-----------------------------