कोल्हापूर न्यूज नेटवर्क
प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूरचे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार - सन 2024-25 व 25-26 या सालाचे जाहीर करण्यात आले आहेत.
दिनांक 5 सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2024-25 करिता जिल्हास्तरीय निवड समिती कडून जिल्हयातील तालुक्यातील पात्र शिक्षकांकडून प्राप्त स्वयंमूल्यमापन प्रपत्रानुसार उच्च गुण प्राप्त शिक्षकांच्या शाळेमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन बीटस्तर, तालुकास्तर तसेच तालुक्यांची अदलाबदल करून त्रयस्थ बाहयमूल्यमापन समितीच्या शिफारशीनुसार जिल्हास्तरावर पात्र प्रस्ताव समितीसमोर सादर केले. त्यानंतर त्रयस्थ बाहय मूल्यमापन समितीमार्फत तपासणी करून दिलेले गुण हे फक्त आदर्श शिक्षक पुरस्कार पात्रता फेरीसाठी ग्राहय धरण्यात आले आहेत. जिल्हा निवड समितीमार्फत शिक्षकांची 50 गुणांची मुलाखत / सादरीकरण याव्दारे गुणदान करुन अंतिम निवड करणेत आली आहे .
सदर निवड प्रक्रियेमध्ये मा. कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर, डॉ. एल. एस. पाटील, प्राचार्य, शासकीय अध्यापक 'कोल्हापूर, सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद कोल्हापूर, शिक्षणतज्ञ डॉ. रघुनाथ कडाकणे, इंग्रजी विभाग प्रमुख, राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर, शिक्षण तज्ञ बी. बी. पाटील , डॉ. श्रीम. मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी संबंधित शिक्षकांची मुलाखत घेऊन 50 गुणांचे गुणांकन केले व खालीलप्रमाणे निवड यादी तयार केली.
सन २०२४ -२५
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार : श्रीमती अर्चना मारुती म्हांगोरे ( विद्यामंदिर शेळप, आजरा ), मारुती गणपती देवेकर (विद्यामंदिर सोनाळी, भुदरगड), श्रीमती किर्ती सुधीर पाटील ( विद्यामंदिर तडशिनहाळ, चंदगड), श्रीमत वैशाी पांडूरंग भोईटे (हसरचंपू विद्यामंदिर, गडहिंग्लज), श्रीमती छाया मधुकर चौगुले (म्हाकवे विद्यामंदिर, कागल), बंडोपंत केशव पाटील (राधानगरी विद्यामंदिर), राजमोहन जगन्नाथ पाटील (भादोली विद्यामंदिर नं.२), आनंदा पांडूरंग पाटील (विद्यामंदिर बाचणी, कागल), श्रीमती उर्मिला अनिल तेली (केंद्रशाळा वेतवडे, पन्हाळा), भानुदास रामचंद्र सुतार (विद्यामंदिर परखंदळे, शाहूवाडी), महमदअसिफ खलील मुजावर (उर्दू विद्यामंदिर घोसरवाड), बाजीराव दादू जाधव (विद्यामंदिर तिळवे बुद्रुक, गगनबावडा). विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार विद्यामंदिर अर्जुनवाडा येथील शिक्षक गणपती लक्ष्मण कुंभार यांना जाहीर झाला आहे.


