आर्यन्स ग्रुपच्या तांडव नृत्याचा थरार

Kolhapur news
By -

 

                 


             कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


 मौजे वडगाव (ता हातकणंगले) येथील स्वयंभू कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ प्राणित आर्यन्स ग्रुपच्या वतीने २५ व्या रौप्य महोत्सवी वर्धापण दिन व गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


       विशेष म्हणजे या वर्षी मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव आगमन मिरवणूकीत आघोरी कलाकारांचा एक वेगाळाच व रोमांचकारी अनुभव घेतला. कलाकारांचे रंगविलेले आघोरी रूप, रौद्र मुखवटे, संपूर्ण अंगावरती लावलेले भस्म राख व शंकराच्या रूपातील तांडव नृत्य पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. काळा रंग, शस्त्र रूप ,त्रिशूल ,खडग , जटा , कवटीमाळा , आशा विविध प्रतिका द्वारे हे नृत्य सादर केले . गणपतीच्या आगमना दिवशी या मंडळाचा हा आनोखा उपक्रम गावामध्ये चर्चेचा विषय ठरला . तसेच महिलांसाठी होममिनिस्टर ' संगीत खुर्ची , लिंबू चमचा , फॅशन शो , हिप्नॉटिझम , तर मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकसारखे वस्त्र परिधान करुण हलगी व लेझीमचा खेळ  खेळत आनंद घेतला . सात दिवस भरगच्च कार्यक्रम करून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .


         ------------------------