स्व. सर्जेराव पाेवार
कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय नानीबाई चिखली ग्रामपंचायतीच्या वतीने दोन वर्षांपूर्वी घेतला . शासन आणि ग्रामपंचायतीच्या निर्णयानुसार सती प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय चिखलीतील पोवार कुटुंबाने घेतला आहे .
पतीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीच्यावेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसून मंगळसूत्र तोडून बांगड्या फोडत पायातील जोडवी काढतात. आजच्या युगात कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. पण या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येते व कायद्याचा ही भंग होतो म्हणून महाराष्ट्र शासनाकडून तसा आदेश २०२३ मध्ये काढला होता. त्याची अंमलबजावणी करत नानीबाई चिखली ग्रामपंचायतीने सती प्रथा बंद करण्याचा ठराव केलेला आहे. महाराष्ट्र शासन आणि चिखली ग्रामपंचायत यांच्या निर्णयास प्रतिसाद देत सर्जेराव पाेवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी मनिषा बाबत विधवा प्रथा बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेत सर्जेरावच्या पत्नीचे सौभाग्याचे लेणे न काढण्याचा निर्णय पोवार कुटुंबीयांनी घेतला असल्याची माहिती त्यांचे कनिष्ठ बंधू बाजीराव पाेवार यांनी दिली.
तसेच पाेवार कुटुंबातीलच जवान स्व.सूरज मारुती पोवार यांचे २५ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले हाेते. त्यावेळीही सूरजच्या निधनानंतर त्याच्या पत्नीबाबत विधवा प्रथा बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोवार कुटुंबाने घेतलेला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करणारे नानीबाई चिखलीतील पोवार हे पहिलेच कुटुंब आहे.
सर्जेराव बापूसो पाेवार यांचे गुरुवार दि. ९ ऑक्टोबरला निधन झाले असून त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी ,भाऊ बहीण, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
--------------------------------------

