सांगली : काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात दाखल झालेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आता राजकारणासोबतच खेळाच्या मैदानावरही लक्ष वेधून घेतले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वात तासगावजवळ येत्या 9 नोव्हेंबर रोजी भव्य बैलगाडी शर्यतीचे आणि बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यातील बैलगाडा शर्यतीसाठी जाहीर केलेल्या भुवया उंचावणाऱ्या बक्षिसांमुळे ही शर्यत राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
येत्या ९ नोव्हेंबर रोजी तासगावजवळ चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा आणि बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन मोठ्या दिमाखात होणार आहे. या शर्यतीची बक्षिसांची यादीच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विजेत्यांसाठी 2 फॉर्च्यूनर कार, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि तब्बल 150 दुचाकी अशी भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. राज्यभरात आजवर कधीही इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या किमतीची बक्षिसे देणारी स्पर्धा झालेली नाही, त्यामुळे या बैलगाडा शर्यतीची चर्चा राज्यभरात रंगली आहे .
-----------------------

