पुढारीचे मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डाॅ. प्रतापसिंह जाधव यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त होत असलेल्या "सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यास कागल तालुक्यातून हजारो लोक जाणार - ना. हसन मुश्रीफ

Kolhapur news
By -

 

               



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क 

   

        

दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डाॅ. प्रतापसिंह जाधव यांचा ८० वा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करूया. बुधवारी दि. ५ कोल्हापुरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त होत असलेल्या "सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आणि सिंहायन या त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यासाठी" कागल तालुक्यातून हजारो लोक जाणार आहेत.


अशा थोर व्यक्तिमत्त्वाचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व प्रमुखांच्या उपस्थितीत  देशाचे माजी कृषिमंत्री ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. समस्त आम्हा कोल्हापूरकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.यासाठी आपण सर्वजण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहूया.


स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९३७ साली थोर पत्रकार कै. ग. गो. जाधव - आबाजी यांनी सुरू केलेल्या दैनिक पुढारीने स्वातंत्र्य लढ्यातही मोठे योगदान दिले आहे. त्यांच्याच आदर्शावर मार्गक्रमण करत पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दैनिक पुढारीच्या माध्यमातून गेल्या पाच तपाहून अधिक काळ अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर निर्भीडपणे आवाज उठवला आहे. त्यांच्यामुळे अनेक प्रश्न मार्गीही लागले आहेत. मराठा आरक्षणासह सर्किट बेंच, सीमाप्रश्न या  महत्त्वाच्या प्रश्नाबरोबरच विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सहकार या क्षेत्रांतही मोठे योगदान दिले आहे. 


दैनिक पुढारीच्या माध्यमातून स्पष्ट व परखड पत्रकारितेतून दिशादर्शक वृत्त मालिका, गोरगरीब सर्व सामान्यांच्या चळवळीचा आवाज बनून त्यांना न्याय दिला आहे. समाजातील चुकीच्या गोष्टीवर त्यांनी निर्भीडपणे आसूड ओढण्याचे काम केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या पद्मश्री डॉ. प्रतापसिंह तथा बाळासाहेब जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यास कागल तालुक्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या ऋणातून उतराई होऊया. 


माझे आणि डाॅ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांचे ऋणानुबंध जिव्हाळ्याचे आहेत. राजकीय आणि सामाजिक जीवनात सर्वसामान्य जनतेच्या विश्वासास पात्र राहून माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांने राज्याच्या मंत्रिमंडळात दीर्घकाळ उठावदार काम करण्यासाठी  पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे  मैत्रीपूर्ण सहकार्य मला मिळाले आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहूया.


गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटील, बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील - गिजवणेकर, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शितलताई फराकटे,  मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, प्रकाश गाडेकर, सुखदेव येरुडकर, शशिकांत खोत, विश्वजीतसिंह पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक सुनीलराज सूर्यवंशी, रवींद्र पाटील, आर व्ही पाटील, प्रवीणसिंह भोसले, बाळासाहेब देसाई - मंनचेकर दिनकर कोतेकर, जे.डी.मुसळे, दत्ता पाटील - केनवडेकर, दिगंबर परीट, जीवनराव शिंदे, बाळासाहेब तुरंबे, राजेंद्र माने, रणजीत सूर्यवंशी, संजय चितारी, संजय फराकटे, सदानंद पाटील, मौजे सांगावचे सरपंच विजयसिंह पाटील आदीप्रमुख उपस्थित होते.स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांनी केले. प्रास्ताविक केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी मानले.


                        ---------------------