दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज भव्य नागरी सत्कार

Kolhapur news
By -

 

                



                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क   

  

    दैनिक पुढारीी चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज (बुधवार दि.५) ८० वा वाढदिवस व  सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा  साजरा होणार आहे. यासाठी पोलिस परेड ग्राऊंडवर जर्मन  हँगर उभारण्यात झाला असून, सोहळ्याची सर्व तयारी  पूर्ण झाली आहे. ससंपूर्ण शाहरभर डॉ. जाधव यांना शुभेच्छा देणारे फलक आणि कमानी उभारण्यात आल्या असून, हा सोहळा लोकोत्सव व्हावा यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गौरव सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष खासदार शाहू महाराज व 'पुढारी' माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी केले आहे.


डॉ. जाधव यांचा वाढदिवस जनतेच्या वतीने लोकोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक गौरव सत्कार सोहळा सामिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते कोल्हापुरातील तालीम संस्था मंडळी सामाजिक व शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 


   या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, माजी कृषीमंत्री शरद पवार , विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोड, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, इतर मागास व बहुजन कल्याण तसेच दुग्धविकासमंत्री अतुल सावे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कौशल्य रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नगरविकास राज्यमंत्री व कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, गृह राज्यमंत्री योगेश कदम हे या सोहळ्यासाठी खास करून उपस्थित राहणार आहेत


                ------------------------------