सर्वधर्मीयांचा राष्ट्राभिमान जागविणारी धीरेंद्र शास्त्रींची दिल्ली ते वृंदावन पदयात्रा .

Kolhapur news
By -

          



      कोल्हापूर न्यूज   /  वि.रा.भोसले


         धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार .अवघे २७ वर्षे वय.त्यांच्या कीर्तीचा अर्ध्या जगात डंका.संपूर्ण भारत ,इंग्लंड, ऑस्ट्रेलिया,फिजी, कॅनडा,दुबई,न्यूझीलंड, युगांडा, मलेशिया,मालदीव,अशा अनेक आशियाई आणि युरोपीय देशात सनातन धर्म जागृतीचा ध्वज फडकवणारा तरुण तडफदार  युवा संत.शतका पूर्वी स्वामी स्वामी विवेकानंदांनी असाच ध्वज शिकागो मध्ये फडकवला होता.सनातन हिंदू धर्म हा एखादा कट्टर पंथीय  धर्म नसून सर्वांना सामावून घेणारी ,सहिष्णू वृत्ती बाळगणारी जीवन पद्धती आहे.


   याच जीवन पद्धतीचा पुरस्कार करून राष्ट्राभिमान जागविणारी  धीरेंद्र शास्त्रींची विशाल पदयात्रा दिनांक ७ नोहेंबर रोजी दिल्लीहून सुरू होणार आहे.१६ नोहेंबरला ती वृंदावन ला पोचेल.दोन्ही ठिकाणे यमुनेच्या काठावर आहेत.त्यामुळे यमुना प्रदूषण मुक्त व्हावी अशीही घोषणा सुद्धा या यात्रेत  करण्यात येणार आहे.

     हिदू राष्ट्र जन जागृती असा मूळ गाभा असलेल्या या यात्रेला कांहीं मुस्लिम व शिख समुदायांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे.एवढेच नव्हे तर पदयात्रेत सामील होण्याची तयारी सुद्धा दर्शविली आहे.अनेक वृत्तवाहिन्या आणि यू ट्यूब, फेसबुक वर सुद्धा मोठ्या प्रमाणात या यात्रेची चर्चा होतांना दिसत आहे.धीरेंद्र शास्त्रींची वक्तव्ये,मुलाखती प्रसिद्ध होत आहेत.

  या पदयात्रेचे प्रचंड स्वरूपात स्वागत होण्यासाठी काही महत्त्वाची कारणे आहेत.

 ती कोणती हे पाहूया. 

 यात्रा दिल्ली या राजधानीच्या शहरातून सुरू होत आहे .तिची सुरुवात राष्ट्रगीतांनेच होईल.भारत हे हिंदुराष्ट्र म्हणून घोषित व्हावे हा एक उद्देश सुध्दा आहे.हिंदू राष्ट्र ची संकल्पना सुद्धा धीरेंद्र शास्त्रींनी उघड केली आहे.भारत हे घटने नुसार  धर्म निरपेक्ष राष्ट्र असले तरी जगातील एकमेव असे हिंदू बहुल राष्ट्र आहे.या राष्ट्रात राहणारे इतर धर्मीय लोक सुधा हिंदूच्या बरोबर बंधुभावाने राहावेत आणि सर्वांनी राष्ट्राभिमान बाळगावा अशी विशाल  भूमिका मांडली आहे.राष्ट्र विरोधी वागणारे लोक जरी ते हिंदू धर्मीय असले तरी त्यांचा धिक्कार व्हावा अशी स्पष्ट भूमिका शास्त्रींनी मांडली आहे.


  सनातन धर्माला कांहीं डाव्यांनी आणि कट्टर पंथीयांनी मनुवाद,आणि चातुर्वर्ण्य यासारखे डाग लावून कलंकित करण्याचा सुध्दा प्रयत्न केला आहे.त्याही पुढे जाऊन क्षेत्रवादी  राजकारण्यांनी डेंग्यू,मलेरियाची उपमा दिली होती.या सर्वांचा परामर्श घेऊन धीरेंद्र शास्त्रींनी स्पष्ट केले की जातीवाद, क्षेत्रवाद,भाषावाद,पंथ वाद विरहित असे एक महान राष्ट्र म्हणून या देशाची जगाला ओळख व्हावी. या राष्ट्राने मानवतेचा  संदेश जगाला द्यावा असा प्रभावी विचार पदयात्रेत मांडण्यात येणार आहे.


    आपण हजार वर्षे परकियांच्या छत्र छायेखाली राहिलो याचे मुख्य कारण म्हणजे आमची वृत्ती गुलामीची बनली होती.छत्रपती शिवाजी महाराज,राणाप्रताप , पृथ्वीराज चौहान ,राणी लक्ष्मी बाई यांनी या शृंखला तोडण्यासाठी आपले सारे जीवन पणाला लावले.फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती आज सुद्धा आपल्यात मुरलेली आहे.

   हे सगळे कलंक पुसून टाकूया आणि एक विशाल राष्ट्र जागवूया म्हणून धीरेंद्र शास्त्री तथा बागेश्वर धाम सरकार यांनी आयोजित केलेल्या या पदयात्रेला प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. बागेश्वर धाम मार्फत  दरवर्षी शेकडो गरीब ,अनाथ कन्यांचे विवाह लावले जातात.माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या वर्षी कन्या विवाहासाठी उपस्थित होत्या.याशिवाय एका मोठ्या मोफत  कॅन्सर हॉस्पिटलची पायाभरणी  माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच वर्षी झाली आहे.

  समाजसेवा व राष्ट्रीय एकात्मतेचा एक नवा अध्याय यातून लिहिला जावा हीच अपेक्षा.

     


        --------------------------------------