कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूरची कन्या कु. सायली किरण भोसले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यसेवा (राजपत्रित वर्ग–1) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेबद्दल पुलाची शिरोली सरपंच सौ.पद्मजा करपे यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सायलीने मिळवलेले यश अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. असे मत करपे यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे, उद्योजक योगेश खवरे,सपोनी किरण भोसले, सौ.रुपाली भोसले आदी उपस्थित होते.
सायली भोसले यांच्या सत्कार प्रसंगी कृष्णात करपे,किरण भोसले, योगेश खवरे, रुपाली भोसले आदी.
--------------


