कोल्हापूर न्यूज / वि.रा. भोसले
आखाती देशात युद्ध भडकले आहे. त्याचा परिणाम शेजारच्या अनेक राष्ट्रावर झाला आहे तसा तो भारतावर सुद्धा झाला आहे. खनिज तेल,गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल यांचा तुटवडा होणारच. यासाठी सरकारला जबाबदार धरून काँग्रेस ने मोर्चे काढायला सुरुवात केली.लोकांच्यात भ्रम निर्माण करायला सुरुवात केली. जसं मागे संविधानचे नॅरेशन निर्माण केले होतं तसं. त्यामुळे त्यांची राजकीय पोळी भाजत असली तरी समाज व्यवस्था अस्थिर होते.लोक गोंधळून जातात.सत्तेसाठी काय पण. हाच एक अजेंडा विरोधी पक्षांनी चालवलाय.सामाजिक भान ठेवायला हवं आहे याचा पण त्यांना विसर पडलाय. हे हताश पणाचे लक्षण दिसते.
इंधन तुटवड्यात केंद्र सरकार जबाबदारी झटकून बसलेले नाही. विरोधी पक्ष याचा फायदा घेणार म्हणून केंद्र सरकारने आधीच सावध होऊन रशिया कडून कोट्यावधि बॅरेल तेल मागवले आहे. याशिवाय तिरंगा झेंडा लावलेली भारताची तेल वाहू जहाजे इराण ने सुरक्षित जाऊ दिली आहेत. ती भारतात पोचली सुद्धा.
विरोधकांनी लगेच चुली पेटल्याच्या बातम्या पसरवायला सुरुवात सुद्धा केली.जर तशी वेळ आलीच तर आपण जपान प्रमाणे त्यालाही सिद्ध राहायला काय हरकत आहे.! विरोधकांनी सुद्धा राष्ट्रीय संकटात सेवेचे योगदान द्यायला पाहिजे.
दुर्दैवाने राहूल, अखिलेश, ममता, केजारीवाल, स्टॅलिन यांना मोदी नावाची अलर्जी झाली आहे.धार्मिक संतुलन बिघडवून खुर्ची टिकवणे किंवा मिळवणे याशिवाय दुसरा अजेंडा नाही.राष्ट्रीय विचारधारा त्यांनी स्वीकारलेलीच नाही.
राहुल अधिवेशन काळात परदेश दौरे का करतात? अखिलेश हिंदू धर्मगुरुवरच का तुटून पडतात. घुसखोर बांगलादेशी साठी ममता धरणे का धरतात.? केजरीवाल अजून पूर्ण निर्दोष नाहीत. त्यांच्या विरोधात हायकोर्ट मध्ये अपील दाखल करण्यात आले आहे. तेवढ्यात त्यांनी थोडे सहा नुभुतीचे अश्रू ढाळून घेतले.
विरोधकांनी सरकारवर जरूर टीका करावी. लोकसभेत चर्चेत भाग घेऊन सरकारला जरूर जाब विचारावेत. पण वडाचे तेल वांग्यावर असे वर्तन करून राष्ट्रीय जबाबदारी पासून स्वतः विचलित होऊ नये. समाजाला सुद्धा विचलित करू नये.राष्ट्र प्रथम हेच लक्ष्य ठेवावे हीच अपेक्षा.
-----------------------------

