कुठे चाललाय महाराष्ट्र आमचा ? भक्ती ने भूक भागत नाही.शक्तीपीठ हवेच कशाला ? शेतकऱ्यांपेक्षा सेलिब्रेटी श्रेष्ठ.?

Kolhapur news
By -

       

        





           कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले


  "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा" या जबरदस्त गाजलेल्या घोष वाक्याने युतीने निवडणूक नुसती गाजवली नाही तर राज्याची सत्ता हस्तगत केली.देवेद्र फडणवीस याच जोरावर2014ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मध्यंतरी चा उद्धव  ठाकरे व एकनाथ शिंदे यांचा काळ सोडला तर 2024पासून ते पुन्हा फूल स्विंग मध्ये राज्याच्या मुख्य मंत्री पदी विराजमान झाले आहेत.


    त्यांच्या कडून योगीजी सारख्या खुप अपेक्षा होत्या. पण चाणक्य नीती शिवाय फारसे कांही दिसून येत नाही.कायद्याचे हात आखूड झालेत.वर्तमानपत्र उघडले की खून, मा रामाऱ्या, बलात्कार, महिलांवरील अत्याचार, लव्ह जिहाद, प्रियकरा साठी नवऱ्याचा बळी.चोऱ्या दरोडे,उपोषणे,यांच्याच बातम्यानी पाने  भरलेली असतात.कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order ) कुठे दडून बसलीय.?


 तलाक कायदा धाब्यावर बसवून अमीर खान तीन लग्ने करतो.सेलिब्रेटी म्हणून सोडून द्यायचे का?शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याची घोषणा करून सुद्धा रोहित पवार अन्नत्याग करायला बसतात व फुकटची प्रसिद्धी मिळवून जातात. अजितदादा विमान अपघातात गेले. त्यावर संशय कल्लोळचे दोन अंक त्यांनी पार पाडले. पार्थ पवार किंवा सुनेत्रा वहिनींनीही त्यांना यात साथ दिली नाही हेही महाराष्ट्राने पाहिले.


    खासदार सुप्रिया सुळे  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारला सतत धारेवर धरतात. शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विडा ताईंनी उचलला आहे असा समज जनतेने करून घेतला. तोवर लेकीच्या लग्नात शाहरुख खानला गळा भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांपेक्षा सेलिब्रेटीच श्रेष्ठ हे दाखवून दिले. महायुती आणि महा आघाडीतील दिग्गज नेते सुळे कुटुंबाच्या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.


 खासदार फुटल्यामुळे उद्धव ठाकरे गरिबांसारखे एका बाजूला उभे होते. संजय राऊत मात्र घरचेच लग्न असल्या सारखे ताठपणे फिरत होते.सारा महाराष्ट्र हे सगळं पहात होता.पण कोणाला कांहीच वाटत नव्हतं.विधान परिषदे च्या आमदारांची निवडणूक, महानगर. पालीकांच्या निवडणुका यात सरकार  गुरफटून गेले होते.


 शेतकऱ्यांना कांदे बटाटे घेऊन बाजारात बसवले आहे.डीग्र्या घेऊन फिरणाऱ्या तरुण पोरां पोरींना नोकऱ्या साठी वणवण फिरावे लागत आहे.शक्ती पीठ विरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.भक्ती ने भूक भागत नाही.त्यामुळे शक्ती पिठाची सक्ती कशाला हवी? प्रयाग राजचा कुंभ मेळा कमी होता काय? पुन्हा नाशिकचा  कुंभ मेळा हवाच होता काय? तोच खर्च सूर्यघर योजनेवर करावा. ती न  संपणारी ऊर्जा आहे. पृथ्वीच्या पोटातले डिझेल पट्रोल, गॅस पुरणार नाहीत. तिला बापाकडे म्हणजे  सूर्याकडे माहेरी धाव घ्यावीच लागेल.


      "कुठे नेवून ठेवला महाराष्ट्रा माझा "अशी घोषणा देऊन सत्तेवर आलेल्यांनी 

   'कुठे चाललाय महाराष्ट्र आमचा '

याकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे.


          ------------------------------