डॉ.श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते मुरगुड नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

Kolhapur news
By -

 



                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       मुरगुड नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉ.श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्थेच्या नवीन लॉकर्स चे उद्घाटन उद्योजक तानाजी सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी एम जे ऍग्रो उद्योग समूहाचे संस्थापक धोंडिबा मकानदार हे होते.



      डॉ. देशमुख यांनी सद्या वयाची नव्वदी ओलांडली आहे. तरीही त्यांच्या अध्यात्मिक सेवेचे योगदान खुप मोठे आहे. ते वेद उपनिषदांचे गाढे अभ्यासक आहेत. मुरगूड व परिसरातील अनेक गावच्या नागरिकांचे ते श्रद्धा स्थान आहेत.  भारत व परदेशात सुद्धा त्यांचे अध्यात्मिक अनुयायी आहेत.



    त्यांचे आशीर्वाद सर्व क्षेत्रात मौलिक मानले जातात.संस्थेचे चेअरमन जावेद  मकानदार हे मुस्लिम बांधव असूनही त्यांच्या सर्व कुटुंबाची श्रद्धा डॉ. देशमुख यांच्या ठायी असलेने डॉक्टरांना  वाजत गाजत कार्यक्रम स्थळी नेण्यात आले. व त्यांचा यथोचित सन्मान करून पाद्य पूजनही करण्यात आले.



    यावेळी संस्थेचे संचालक सौ. कांचन खराडे, ज्योती शिंदे, नवीज खेडेकर, राजेंद्र बुरुड, सचिन जाधव, राजन तासीलदार, दिलीप सोनुले, दिगंबर शिंदे, पांडुरंग कुडवे, तुकाराम शिंदे, शिवाजी करडे,विनायक हावळ, रामचंद्र करडे,संजय घोडके जयवंत हावळ,ज्योतीराम सूर्यवंशी,एकनाथ देशमुख, इत्यादिंची उपस्थिती होती.व्यवस्थापक अजितकुमार कापसे यांनी प्रास्ताविक केले, हृषीकेश गोडबोले यांनी आभार मानले.






                      ----------------------

.