कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कागल तालुका चौदा वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत मुरगूडच्या एम जे इंटरनॅशनल स्कूल ला दुसरा क्रमांक मिळाला आहे.कागल येथील दूध गंगा विद्यालयाच्या प्रांगणात या स्पर्धा संपन्न झाल्या.
मुलींच्या या संघाला क्रीडा शिक्षक करण मांगले आणि सौ.संकल्पा मगदूम यांनी मार्गदर्शन केले होते. संस्थेचे चेअरमन जावेद भाई मकानदार प्राचार्या जस्मिन जमादार आणि इतर शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले होते.
कबड्डी मध्ये प्रथमच तालुक्स पातळीवर यश मिळवल्याबद्दल या मुलींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
----------------------

