लातूर : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज लातूर जिल्ह्यातल्या जाऊ गावात पोहचलेत. आता रब्बीसाठी शक्य ती मदत करू, बळीराजासाठी सर्व काही करू, सगळ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अक्षरशः रडू कोसळले.
फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त जाऊ गावातील पीक परिस्थिती, पाण्याची उपलब्धता याची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सर्व काही करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाला पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
--------------------


