कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील लाल आखाडा युथ सर्कल आणि सस्पेन्स ग्रुप या मंडळाच्या संयुक्त गणेश मूर्तीचे विसर्जन आज अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
विसर्जनापूर्वी सत्यनारायण महापूजा आणि महाआरती चे सुंदर नियोजन करण्यात आले होते. महिला भगिनींची प्रचंड उपस्थिती हे या विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. भगिनींनी अत्यंत उत्साहात गौरी व गणेश गीते सादर केली.गणेश गणेश मोरया पुढच्या वर्षी लवकर या यासारख्या घोषणांनी आकाश निनादून गेले.तिन्ही मंडळांच्या युवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढली. मिरवणुकीत उत्तम सजावट करण्यात आली होती.
गणेशाच्या अत्यंत रेखीव देखण्या मूर्तीला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते.महिला भगिनींनी सुद्धा अलगदपणे अश्रूना वाट करून दिली. विविध वाद्ये व ,आतशबाजी तून ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून योग्य नियोजन करण्यात आले होते.
एक आदर्श गणेश विसर्जन मिरवणूक म्हणून नागरिकांनी या विसर्जन मिरवणूकीचे कौतुक केले.
----------------

