कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगल ) येथील डॉ. अभिजित खुरपे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून व्यवसाय व्यवस्थापन (Business Management) विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी आपले संशोधनकार्य यशस्वीपणे पूर्ण करून विद्यापीठाच्या सर्व आवश्यक शैक्षणिक प्रक्रिया आणि अंतिम मौखिक परीक्षा समाधानकारकरीत्या पूर्ण केली.
डॉ. अभिजित खुरपे हे सध्या डीईएस पुणे विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून अध्यापन, संशोधन, शैक्षणिक प्रशासन आणि संस्थात्मक विकास या क्षेत्रांत सक्रिय योगदान देत आहेत. तसेच, IEEE पुणे विभागाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी तांत्रिक शिक्षण, विद्यार्थी विकास आणि सामाजिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.
त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, सहकारी, विद्यार्थी, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक व व्यावसायिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक व संशोधन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
----------------------------

