राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी साधला संवाद

Kolhapur news
By -

 

            


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज कोल्हापूर दौऱ्यात जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. शासकीय विश्रामगृह येथे ही भेट झाली. राज्यपालांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्तींचा भेटीमध्ये समावेश होता. 


यावेळी कृषी, उद्योग, व्यवसाय आणि वास्तुकला क्षेत्रातील डॉ. संजय डी. पाटील, सर्जेराव पाटील, सुरेंद्र जैन, नीरज झंवर, मोहन कुशिरे, राजीव पाटील, भरत जाधव, वर्धन वडगावे आणि अजय कोराने यांनी राज्यपालांची भेट घेतली.

तसेच वैद्यकीय, सनदी लेखा, विधी आणि साहसी क्षेत्रातील डॉ. अशोक भूपाळी, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. सुरज पवार, डॉ. सतीश पत्की, सीए आशिष सेवेकरी, ॲड. श्रीकृष्ण गनबावले, ॲड. राजेंद्र मंडलिक, इतिहासकार जे. के. पवार आणि सागर पाटील यांनीही राज्यपालांशी संवाद साधला.


कला, क्रीडा, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील भरत जाधव, तेजस्विनी सावंत, सोनम म्हस्कर, अनिल पवार, विजय जाधव, शेखर जोशी, सचिन जवळकोटे, चंद्रकांत पाटील, मयुरी आळवेकर आणि विजय उपाध्ये यांनी राज्यपालांची भेट घेतली.


कोल्हापूरी चप्पल कारागिर शुभम सातपूते यांनी कोल्हापूर चप्पल निर्मिती, विक्री याबाबत सविस्तर माहिती दिली.

कोल्हापूरच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या मान्यवरांशी राज्यपालांनी यावेळी संवाद साधत त्यांच्या कार्याचा आणि अनुभवांचा आढावा घेतला. यावेळी मान्यवरांनी कोल्हापूरसाठी आवश्यक पायाभूत सुविधा तसेच शासनाकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या.  


याप्रसंगी मा. राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, एमएसएमई (MSME) आयुक्त तथा एमएसएसआयडीसी (MSSIDC) व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. जॅसमिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकरी गजानन गुरव, करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले आदी उपस्थित होते.


               ---------------------