गोकुळची टी २५ मॅच सुरू. बंटी पाटलांचे चौकार आणि षटकार. महायुतीची गचाळ फिल्डिंग.

Kolhapur news
By -

 

              


              कोल्हापूर न्यूज  /  वि.रा.भोसले


      ह्या वेळेला कधी नाही ते गोकुळची निवडणूक गाजत आहे. सध्या क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे त्याच भाषेत गोकुळ च्या निवडणुकी बद्दल सांगितले की अधिक समजेल.


       गोकुळ ची सद्या T 25 मॅच सुरू आहे. म्हणजे 25 संचालक निवडले जातील. जाहिरात तर भरपूर झाली आहे.मैदानात रथी महारथी उतरले आहेत.त्यात मॅच फ़िक्सिग झालंय की काय असा संशय येऊ लागला आहे. ज्यांना विरोधक म्हणून खिसगिणतीत घेतले जात नव्हते ते बंटी पाटील चौकार आणि षटकार मारताना दिसत आहेत. रथी महारथी त्यांच्या टीम मधून खेळतील असे दिसते.महायुती फिल्डिंगला उतरली आहे. अनेक झेल सुटत आहेत. त्यामुळे गॅलरीतून मॅच पाहणारे प्रशिक्षक गचाळ फिल्डिंग म्हणून ओरडताना दिसत आहेत.



   बंटी पाटलांचे षटकार पाहून वैभव सूर्यवंशी मैदानात उतरला आहे की काय असे त्यांना वाटत आहे.पावसाअभावी  250 हुन अधिक तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. गोकुळ मध्ये मात्र सुकाळ सुरू आल्यासारखे वाटते. अंतर्गत वादामुळे महायुची ची टीम जरा दुबळी ठरते की काय असे वाटून प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या प्रशिक्षक साहेबांचा चेहेरा जरा 'गंभीर 'बनला आहे. तरीही युतीवाले म्हणतात की मॅच आम्हीच जिंकणार.


    कोण जिंकणार हे मतदार ठरवतील. कालची अदृश्य शक्ती कोण होती याचा शोध अजुन लागलेला नाही. पण बंटी पाटील यांच्या मागे एखादी अदृश्य शक्ती असावी असे वाटू लागले आहे.या क्रिकेट मधले रो को (रोहित. कोहली ) सुद्धा बंटी पाटलांच्या गळा ला लागले आहेत असे दिसते.



    गोकुळचे मतदार आणि उत्पादक हुशार आहेत त्यामुळे कुणाची नावे इथे जाहीर करण्याची गरज नाही. गोकुळ आता वृंदावन मध्ये नसून कुरुक्षेत्रावर आहे. जय श्रीकृष्णा.



                 ---------------------------