कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने यांनी माघार घेतली आहे. माने यांनी महायुतीकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. दरम्यान महायुतीमध्ये पदवीधर जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आहे. भाजपकडून पदवीधरसाठी डॉ. स्मिता योगेश जाधव यांची उमेदवारी घोषित केली आहे.
महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे भैय्या माने अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती ,अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. पुणे पदवीधरसाठी उमेदवारी माघारीची मुदत दहा ऑक्टोबरपर्यत होती. माने यांनी सकाळी कागल येथील कॉलेजमध्ये बैठक घेतली. त्यामध्ये माघारीचा निर्णय झाला. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व कागल तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
------------------

