मुरगुड विद्यालयात हजारो विद्यार्थिनींच्या निसर्गगीतांतून हादगा बोळवण उत्साहात : हातग्याच्या पारंपारीक गीतांची बरसात करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश.

Kolhapur news
By -

 

            


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क



भारतीय लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा जपणाऱ्या हादगा उत्सवाची सांगता मुरगूड विद्यालयात हजारो विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागातून  महाहादगा बोळवण सोहळ्याने झाली.


 निसर्गाशी नाते सांगणारी पारंपारीक हादग्याची गाणी, फेरावर फेर धरून मुलींनी गायीली.त्यातून लोकसंस्कृतीचा अद्भुत अविष्कार पहायला मिळाला.

      निसर्गाशी नाते जोडणाऱ्या या लोक संस्कृतीची ओळख किशोरवयीन मुलींना  व्हावी हा उद्देश ठेऊन महा हातग्याचे आयोजन करण्यात येते.मानवी जीवनाचा सांगाती असलेल्या निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही उद्देश होता.मनोरंजनातून निसर्गाशी मनोमिलन  घडवून आणणाऱ्या या सोहळ्यातील मुलींचा उत्फूर्त सहभाग दिसून आला.


 या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई,अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत चेअरमन डॉ. मंजिरी मोरे, युवा नेते दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीण सिंह पाटील,सौ. अंजली देसाई ,सौ.ऋतुजा मोरे यांची प्रेरणा लाभली.


 शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित गोपाळकृष्ण गोखले कॉलेज च्या  सुशीलादेवी मल्हाराव देसाई युवती सचेतना फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने व मुरगुड विद्यालयाच्या संयोजनाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुरगुडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील  प्रमुख उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस पी पाटील होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हस्तदेवता, शिक्षण महर्षी एम आर देसाई, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर, परमपूज्य दत्ता बाळ, कै. सुशीला देवी देसाई, ग.बा.सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात आले. 


    

  यावेळी मुरगूड पोलीस ठाण्याच्या  शुभा भोसले,विद्या परीट, प्रशांत गोजारे प्रमुख उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका यु.सी पाखरे यांनी केले यावेळी उपप्राचार्य व्ही.जी. घोरपडे, पर्यवेक्षक ए.एन. पाटील,पी.बी.लोकरे, महादेव कांबळे, पी. एस. पाटील एम. बी. टिपूगडे, टी. एस. पाटील वाय.ई देशमुख, सौ.जे. टी .पवार यू.पी .कांबळे, एस. जे. गावडे, एस.डी. कुंभार,बी.वाय.मुसाई, आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन  एल.के पाटील, एस. एस .पाटील, व्ही .एस. सूर्यवंशी यांनी तर आभार आर. एस .पाटील यांनी मानले.





           --------------------