ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गगनबावडा तालुक्याचा नावलौकिक वाढवावा - संभाजी पाटणकर

Kolhapur news
By -

 

               


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क  



गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने चालना देण्यासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये स्पर्धात्मक दृष्ट्या शिष्यवृत्ती ,नवोदय , स्कॉलरशिप , अशा विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गगनबावडा तालुक्याचा नावलौकिक वाढवावा .असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर यांनी केले . ते धुंदवडे ता .गगनबावडा येथे आयोजित चौथी ,सातवी शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते .यावेळी सभापती सौ छाया देसाई , उपसभापती राजेश पाटील ,सदस्य शुभांगी संकपाळ , यांची प्रमुख उपस्थिती होती .


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले . प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सौ .वसुंधरा कदम यांनी केले .गेल्या वर्षभरामध्ये राबविण्यात आलेल्या सहशालेय उपक्रमाबरोबरच शिष्यवृत्ती , नवोदय , स्कॉलरशिप परीक्षेचा गुणवत्तेचा आढावा घेतला . मान्यवरांच्या हस्ते चौथी , आणि सातवी प्रत्येकी पहिल्या दहा विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले . यावेळी जि प सदस्य संभाजी पाटणकर म्हणाले . कमी लोकसंख्या, विखुरलेली गावे त्यामूळे गगनबावडा हा बारावा तालुका अशी ओळख आहे.शैक्षणिक गुणवत्तेतही तो बारावा म्हणून ओळखला जातो.शैक्षणिक प्रगती व्हावी, जिल्हा पातळीवर नावलौकिक वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे .


 कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच .एम .जी .पाटील , केंद्रप्रमुख राहुल पाटील ,मुख्याध्यापक विश्वनाथ चौगले, कुंडलिक संकपाळ , शिक्षक बँकेचे व्हा . चेअरमन गजानन कांबळे ,अनिल खिल्लारे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ .सुजाता पाटील ,नितीन गोरे , उपस्थित होते .सूत्रसंचालन व आभार एम .जी . गुरव यांनी मानले .


        

  धुंदवडे ता गगनबावडा येथेसर्व पदाधिकारी समवेत चौथी,सातवी ,सराव चाचणी परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी ,व मार्गदर्शक शिक्षक .


           -----------------------------