कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जर्गी ता .गगनबावडा येथील प्राथमिक शाळेमध्ये 26 नोव्हेंबर हा भारताचा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गगनबावडा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सौ वसुंधरा कदम होत्या .
प्रारंभी महामानव भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले . यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ .वसुंधरा कदम यांनी आपल्या मनोगतातून संविधानाचे महत्व, संविधान निर्मात्यांचा गौरव तसेच संविधानाचे मूलभूत अधिकार व कर्तव्य यांचा उलगडा केला. तसेच आपले संविधान, आपला अभिमान या प्रेरणेने शाळेमध्ये संविधानाची मूल्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता रुजवणे आणि जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक संकपाळ , पोषण आहार प्रमुख राणी चौगले , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय वरपे, अनिल खिल्लारे, मुख्याध्यापक धोंडीराम कदम,सचिन पाटील,श्रीकांत निमकर्डे , अमोल भूतल तसेच सर्व शिक्षक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
जर्गी ता गगनबावडा येथील प्राथमिक शाळेमध्ये संविधान दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना .गटशिक्षणाधिकारी सौ .वसुंधरा कदम,सोबत शिक्षक विद्यार्थी .
----------------------


