मुरगुड मध्ये अवतरले राम लक्ष्मण आणि रावण. 'रामायण 'च्या प्रदर्शनाचे शहरात शानदार स्वागत.

Kolhapur news
By -

 

       


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क



 'रामायणम 'या भव्य चित्रपटाच्या प्रदर्शनाचे आयोजन  विदयार्थ्यांसाठी करण्यात आले होते. एम जे इंटरनॅशनल स्कूल च्या या उपक्रमाचे मुरगूड शहरात भव्य स्वागत करण्यात आले.


   लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी प्र. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत समारंभ शिवतीर्थ येथे संपन्न झाला.

  या वेळी उत्साही कलावंत राम, लक्ष्मण आणि रावण यांच्या तंतोतंत भूमिकेत प्रकट झाले. त्यांचे विलोभनीय दर्शन होताच अनेक श्रद्धाळू भक्त अक्षरशः त्यांच्या समोर नतमस्तक झाले. नागरिकांचा हा उत्साह पाहून राम, लक्ष्मण व रावण या त्रिमूर्तीची बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. 


नगर परिषदेमार्फत उपनगराध्यक्षा श्रीमती मांगले गटप्रमुख सुहास खराडे, आरोग्य विभाग सभापती सत्यजितसिंह पाटील यांनी पाटील यांनी राम, लक्ष्मण, रावण या त्रिमूर्तींना हार अर्पण केले.नगरसेवक सुनील रणवरे यांनी प्रस्ताविकात रामायण च्या आयोजनाबद्धल मौलिक विचार मांडले.मुस्लिम धर्मीय असूनही जावेद मकानदार कुटुंबीय नेहमीच सर्व धर्माच्या विविध परंपरांचा अत्यंत आत्मीयतेने सन्मान करतात. शाळेच्या विद्यार्थी पालकांसाठी स्वखर्चाने त्यांनी रामायण चे आयोजन केले.


 नगराधक्षा सौ. पाटील यांनीही त्यांचे कौतुक केले. जेष्ठ नगरसेवक शिवाजीराव चौगुले, नगरसेवक सम्राट मसवेकर, दीपक शिंदे, यांच्या सह कर्मचारी, पालक, रामभक्त नागरिक मोठया संख्येने हजर होते. ओंकार पोतदार यांनी प्रभू राम, राज तांबट यांनी लक्ष्मण,तर प्रदीप  भोपळे यांनी उग्र रावण हुबेहूब सादर केले होते. जणू हे त्रिमूर्ती मुरगूड मध्ये अवतरले अशा थाटात नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.

        



              -------------------------