यात्रेनंतरही भक्तिभावाचा जागर! मुरगूडच्या युवकांनी चकाचक केला कुरणीतील हालसिद्धनाथ मंदिर परिसर

Kolhapur news
By -


           




            कोल्हापूर न्यूज नेटवर्क



कुरणी येथील हालसिद्धनाथ यात्रा सलग चार दिवस सुरू होती.लाखो भाविकांनी यात्रेला गर्दी केली. भजन, कीर्तना सह शेवटच्या दिवशी बैलगाड्या, घोडा गाडयांच्या शर्यती सुद्धा होत्या.या यात्रेची सांगता झाली. मंदिरात आणि परिसरात कचऱ्याचे ढीग पडले. सार्वजनिक आरोग्याला बाधा आणणारे कचऱ्याचे हे ढीग मुरगूडच्या युवकांनी  विना विलंब व विना मोबदला हलवले व त्यांची योग्य विल्हेवाट लावली.


   'शिवभावे जीवसेवा' हे नेहमीचे भक्ती सूत्र युवकांनी अमलात आणले. मोबाईल, नेटफ्लिक्स आणि केवळ मनोरंजनात गुंतलेल्या शेकडो यु ट्यूब शोकीनांना ही एक प्रभावी चपराक होती. खरं तर  एक प्रेरणा म्हणून या सामाजिक कार्याचे उत्साहाने स्वागत इतर युवकांनी करायला हवे इतका सेवाभाव पहायला मिळाला. पहाटे पाच वाजल्या पासून थंडीत स्वछतेला सुरुवात करून चार ट्रॉली कचरा काढला. मंदिर आणि मंडप पाण्याने स्वच्छ धुवून काढला.भाकणूक कार गुरु कृष्णात डोणे आणि मंदिर पुजारी विनायकराव पाटील यांच्या हस्ते मंदिर व्यवस्थपनाने श्रीफळ व श्री प्रसाद देऊन युवकांचा सत्कार केला.


    स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांची नावे याप्रमाणे. सोमनाथ यरनाळकर तानाजी भराडे,सर्जेराव भाट,शिवाजी चौगुले, आनंदा रामाणे, ओंकार पोतदार, प्रफुल्ल कांबळे, जगदीश गुरव,अमोल मेटकर, धनंजय सूर्यवंशी, संकेत शहा, रघुनाथ बोडके, अक्षय पोतदार, नामदेव भराडे, बाळासो भराडे,संभाजी भराडे, वेदांत मंडलिक, एकनाथ भराडे, अक्षय पोतदार,रणजित मोहिते, केरबा भराडे, अनिल प्रभावळे, कुणाल क्षीरसागर विवेक कुंभार,आनंदा मोरे इत्यादी.





                   ------------------------