कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी
खाजगी प्राथ. शाळांतील शिक्षक भरतीसाठी असलेली पावित्रपोर्टल प्रणालीबंद आहे . ती ओपन करुन खाजगी प्राथ. शाळांच्या मागणीप्रमाणे शिक्षक भरतीस परवानगी द्यावी, अशी मागणी खाजगी प्राथ. शिक्षक सेवक समितीच्या वतीने शिक्षणमंत्री नाम. वर्षाताई गायकवाड यांच्याकडे करणेत आली.
समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी शिक्षण मंत्र्यांना याबाबतचे निवेदन दिले यावेळी शरद केनवडे, सुनील कारंजकर ,वैभव, कांबळे हे हंजर होते.
शिक्षणमंत्री नाम.वर्षाताई गायकवाड यांनी या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंखी यांना बैठकीसाठी बोलविण्यात आले असून या बाबतीत निर्णय घेण्यात येईल व बंद असलेली पवित्रपोर्टल प्रणाली चालू करण्यात येऊन खा. प्राथ. शाळांना आवश्यकतेनुसार भरतीची प्रक्रिया राबविण्यास परवानगी देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच टप्पा अनुदानित शाळांना पुढील टप्पा अनुदान देण्यास शासन बांधील असलेचे स्पष्ट केले.
या भरतीसाठीचे निवेदन अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनाही देण्यात आलेचे
भरत रसाळे यांनी सांगितले.
