कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी
दिनांक ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये शासनाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी "बालदिवस सप्ताह" साजरा करण्यात आला होता. यानुषंगाने जिल्हास्तरावर ऑनलाईन प्रणालीचे लॉगिन देऊन तालुकास्तर व जिल्हास्तरावरील कामकाज पूर्ण करणेसाठी सूचित करण्यात आले होते.
यानुसार बालदिवस सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांसाठी सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यासाठी https://covid19.scertmaha.ac.in/baldiwascert/studentlist.aspx या लिंकवर क्लिक करून सहभागी विद्यार्थी यांनी यापूर्वी प्रणालीमध्ये नोंदविलेला आपला मोबाईल क्रमांक टाकून उपक्रमनिहाय आपले सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतात आवाहन
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे चे संचालक दिनकर टेमकर यांनी राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना केले आहे.
अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्राबरोबर देण्यात आलेल्या मार्गदर्शक प्रपत्रामध्ये दिल्यानुसार विद्यार्थी आपले सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतील.
