सावित्रीच्या लेकी ग्रुपमार्फत म्हाकवे विद्यामंदिर मध्ये सत्कार सोहळा

Kolhapur news
By -
       कोल्हापूर न्यूज /  प्रतिनिधी
       
       शनिवार दिनांक  ०६ फेब्रुवारी २१  रोजी वि.मं .म्हाकवे या ठिकाणी म्हाकवे शाळेच्या आविष्कार फाऊंडेशन आदर्श शिक्षक पुरस्कार  प्राप्त शिक्षिका तसेच प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये 7 विद्यार्थी गुणवत्ताधारक बनवूण ज्यांनी उज्वल यश प्राप्त केले अशा उपक्रमशील शिक्षिका सौ. अर्चना भरते व सौ .वैभवी पाटील यांचा सत्कार कागलच्या सावित्रीच्या लेकी महिला शिक्षिका ग्रुपमार्फत करण्यात आला. 

    ग्रुपच्या  सदस्या  व कागल तालुका पतसंस्था संचालिका साै.विजया चव्हाण यांचा सत्कार या  करण्यात आला .

    प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये ज्या ७ विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले यांनाही ग्रुपमार्फत शैक्षणिक साहित्य बक्षीस दिले .
 याचबरोबर या शाळेचे माजी शिक्षक माने मॅडम , जाधव मॅडम,पोटले मॅडम आणि निकडे सर यांच्यामार्फतही भरते मॅडम आणि पाटील मॅडम यांचा सत्कार करणेत आला.
    आजच्या या कार्यक्रमामध्ये प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस सुनिल  पाटील यांनी सावित्रीच्या लेकींच्या या उल्लेखनीय  उपक्रमांची दखल घेत ग्रुप ऍडमीन सौ.मुनीरा आवटे  व  ग्रुपमधील  सर्वच महिला सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
         कार्यक्रमामध्ये सीमाभाग शिक्षक संघटना सरचिटणीस बुधाळे सर , सौ. चव्हाण मॅडम व सौ. पोटले मॅडम यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याधापक  विजय पाटील हाेते. पाटील सरांनी या महिला टीमच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक सौ. चव्हाण मॅडम यांनी केले . आलेल्या सर्व महिला टीमचे शब्दसुमनांनी स्वागत खोत सर यांनी केले . तर सूत्रसंचालन महिला संघटक  मुनिरा आवटे  यांनी केले . शेवटी आपल्या  गोड वाणीत कार्यक्रमाचे आभार सौ. सारिका कोरे  यांनी व्यक्त केले .

  आजच्या या सत्कार सोहळ्याला सावित्रीच्या लेकी ग्रुप सदस्या मुजावर मॅडम, कोरे मॅडम , मिस्त्री मॅडम , कुंभार मॅडम, सुप्रिया पाटील मॅडम , औंधकर मॅडम , माने मॅडम , पोटले मॅडम ,   चौगुले मॅडम ,  जाधव मॅडम , 
वाडकर मॅडम , सुतार मॅडम उपस्थित हाेेत्या. 
 वि. मं. म्हाकवे शाळेच्या  संपूर्ण शिक्षक स्टाफने उपस्थिती लावली.