ड्रायव्हरचा मुलगा बनला कर सहाय्यक

Kolhapur news
By -

 

                          

                


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथील करीम इम्तियाज जमादार याने   पहिल्याच प्रयत्नात कर सहाय्यक या पदाला गवसणी घातली आहे . यापूर्वी करीम मुंबई महापालिकेकडून घेण्यात आलेल्या कार्यकारी सहाय्यक या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर काही महिन्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहाय्यक पदासाठी करीमची निवड झाल्यामुळे त्याच्यावर अभिनंदनचा  वर्षाव होत आहे.  


करीम चे वडील ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत.  सर्वसामान्य अल्पसंख्यांक कुटुंबातील ड्रायव्हरच्या मुलाने सलग दोन परीक्षेत परीक्षेत यश मिळवून इतर विद्यार्थ्यांच्या समोर एक आदर्श ठेवला आहे. 


          करीम चे प्राथमिक शिक्षण चिखलीतील कुमार विद्यामंदिर मध्ये  , माध्यमिक शिक्षण चिखली इंग्लिश स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण देवचंद कॉलेजमध्ये झाले आहे. शिवाजी विद्यापीठातून एम एससी केले आहे. त्यानंतर कागलच्या डी आर माने महाविद्यालयातून बी एड ची पदवी ही घेतली आहे. 


       या दोन परीक्षेत जरी यश मिळवले असले तरी करीम सध्या एमपीएससीच्या  'क्लास टू' पदाच्या परीक्षेसाठी तयारी करत असून  या परीक्षेत ही यश मिळवण्याचा आत्मविश्वास करीमने बोलून दाखवला. 

  
 करीम च्या  या यशाच्या प्रवासात अबिदसो हसनसो मुश्रीफ (अध्यक्ष-पंचशील शिक्षण समुह), रयत प्रबोधिनी पुणेचे संचालक उमेशजी कुदळे सर व आई फौंडेशन शिक्रापूर (निवासी शिष्यवृत्ती), सर पिराजीराव घाटगे क्रीडा संकुल व दाजी समीर आवटी यांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शन व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना परिवारातील सर्व सदस्य, काही मित्रांच्या अनमोल मदतीचे आभार मानले. आई वडील व बहिणीचे अनमोल सहकार्य लाभले. 

      ----------------------------