मुरगूड च्या काशिलिंग बिरदेव मंदिरास पाचशे एक किलोचा पुष्पहार अर्पण.वालंग समाजाचा पारंपारिक उत्सव साजरा.

Kolhapur news
By -

 


      


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


 ऐतिहासिक मंदिर आहे. त्याला बिरोबा देवालय असेही म्हणतात.वालंग धनगर समाजाचे हे एक जागरूक श्रद्धा स्थान मानले जाते.

   दरवर्षी येथे देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. परंपरे नुसार मंदिराला  पाचशे एक किलोंचा पुष्प हार  अर्पण करण्यात आला. मंदिराच्या अग्रभागी हा हार लावला जातो.


    ढोल वादन स्पर्धा हे इथले वैशिष्ट्य आहे. या शिवाय फटाक्यांची आतषबाजी , विद्युत रोषणाई असते.


    यात्रेत तुकाराम पुजारी यांची भाकणूक असते. भाकणुकी नंतर मंगळवार दि. 6 एप्रिल रोजी महा प्रसाद आहे.


   राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी याच मार्गाने पाटगावला मौनी महाराज यांचे दर्शना साठी गेले होते. वाटेवरच्या या मंदिरात ते कांही काळ आपल्या लवाजम्या सह थांबले होते. यमगे येथील चौकीदारास लिहिलेल्या सूचना पत्राचा उल्लेख इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात मलपृष्ठावर पहावयास मिळतो.


  ऐतिहासिक महत्व असलेल्या या मंदिरात दरवर्षी प्रमाणे  वालंग उत्सव जोरात साजरा झाला.


   उत्सवा साठी आकाश डेळेकर, सुशांत भोसले, संदीप भारमल, अमोल पाटील, बाळकृष्ण चव्हाण, अजित कांबळे, प्रशांत भुते, विजय गोधडे, सत्यजित सिरशेकर, सौ. अश्विनी चव्हाण, माया चव्हाण, सानिका चव्हाण, धनश्री चव्हाण, विनायक भोई, विशाल गुरव, राजेंद्र चव्हाण या मराठा समाजातील व्यक्तींनी सुद्धा योगदान दिले.


    धनगर समाजातील तुकाराम पुजारी, जगन्नाथ पुजारी, साताप्पा मेटकर, सागर पुजारी, सिद्धू दिवटे, लक्ष्मण पुजारी, समाधान बोते, सदाशिव पुजारी, पांडुरंग पुजारी, मारुती दिवटे, संजय मेटकर, आदित्य मेटकर,मेटकर ड्राईव्हर यांनी विशेष पुढाकार घेतला.





      --------------------------------------