कोल्हापूर न्यूज नेटवर्क
येथील क्रांतीवीर हुतात्मा हरीबा बेनाडे यांच्या ८२ व्या बलिदान दिनानिमित्त आज गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. प्रखर राष्ट्रभक्ती आणि त्यागाचे प्रतीक असलेल्या हुतात्मा बेनाडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या क्रांतीज्योतीचे पूजन पोलीस पाटील अमृता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर, हुतात्मा हरीबा बेनाडे यांच्या पुतळ्याचे पूजन बिद्री कारखान्याचे माजी संचालक प्रवीणदादा भोसले व संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सदाशिव तुकान यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच युवराज कुंभार, माजी सरपंच महंमद मुल्लाणी, माजी उपसरपंच विजय घस्ती , अरुण गळतगे, नसरुद्दीन नाईक ,बाळकृष्ण संकपाळ , मुख्याध्यापक शरद बोरवडेकर, संजय कोगनुळे, कुमार कोगनुळे, मारुती तुकान, सावंता बेनाडे व समस्त बेनाडे परिवार, चिखली इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक नजीर नाईक यांनी केले. आभार शहाजी कोगनुळे यांनी मानले.
---------------------------

