खडकेवाडात अज्ञात प्राण्याचा चार बकऱ्यांवर पुन्हा हल्ला ; शनिवारच्या हल्ल्यात १४ बकरी मृत्युमुखी पडली होती

Kolhapur news
By -
 


       कोल्हापूर न्यूज  /  प्रतिनिधी

   खडकेवाडा ता.कागल येथील आनंदा वासूदेव मेटकर या मेंढपाळाच्या ४  बकऱ्यावर चार दिवसानंतर अज्ञात प्राण्याने पुन्हा हल्ला केला. शनिवारी दि. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात १४ बकरी मृत्यूमुखी पडली होती.त्यामुळे मेटकर कुंटूबियांचे आर्थिक नुकसान झाले. 


हल्ल्याच्या स्वरूपावरून तरसच असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.याबाबत ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.

     गावच्या उत्तरेला माळरानावर मेटकर यांचा मेंढ्यांचा कळप आहे.अज्ञात प्राण्यांने लोखंडी जाळीवरून उडी मारून या कळपावर हल्ला केला.वनपाल बी. एन. शिंदे, डी. ए. टिकले,पशुवैद्यकीय अधिकारी व्ही.व्ही.मगदूम,तलाठी उमा कारंडे,पोलिस पाटील आप्पासाहेब पोवार, कोतवाल सुरेखा खोत यांनी घटनेचा पंचनामा केला.यावेळी ग्रा.पं.सदस्य बाबु मेटकर, योगेश साबळे उपस्थित होते.या कुंटुबाला शासनपातळीवरून त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.