कोरोना काळात गगनबावडा आरोग्य विभागाने केलेली कामगिरी ऐतिहासिक साक्ष - सभापती सौ . सगिता पाटील यांचे प्रतिपादन

Kolhapur news
By -

       कोल्हापूर न्यूज / अणदूर प्रतिनिधी

      भौतिक सुविधांची वानवा असताना देखील आजपर्यंत गगनबावडा आरोग्य विभागाने कोरोनाकाळात प्रशासकीय यंत्रणा , कर्मचारी बांधवानी घेतलेले कष्ट हे माझ्या
तालुक्यासाठी ऐतिहासिक साक्ष आहे .
असे प्रतिपादन गगनबावडा तालुक्याच्या सभापती सौ . संगिता पाटील यांनी केले .

       त्या पळसंबे.ता. गगनबावडा येथे आयोजित
साखर कारखान्‍यात येणारे परराज्‍यातील, परजिल्‍हयातून ऊस तोड मजूर, कर्मचारी यांचे मोफत रोगनिदान व उपचार करण्याच्या उद्देशाने प्राथमिक  आरोग्‍य केंद्र गारीवडे अंतर्गत  व्‍हर्नेबल कॅम्‍पच्या उद्घाटनप्रसंगी त्या अध्यक्षस्थावरून बोलत होत्या .उपसभापती पांडूरंग भोसले प्रमुख पाहुणे उपस्थिती होते .


 कॅम्‍पमध्‍ये मजूर, गर्भवती महिला, लहान मुले यांना मोफत उपचार देणेत आले.
      प्रास्ताविक व स्वागत आरोग्यधिकारी डॉ . विशाल चोकाककर यांनी केले .
या कॅम्पसमध्ये गेल्या वर्षेभरात आरोग्य विभागाने राबविले उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला .
मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात सल्लग शंभर दिवस रुग्णसेवा दिल्याबद्ल वैद्यकीय अधिक्षक डॉ .विलास देशमुख यांचा सत्कार करण्यात आला .
    कार्यक्रमास उप‍सभापती पांडुरंग भोसले, सदस्‍या मंगल कांबळे, गटविकास अधिकारी शरद भोसले, स्‍त्रीरोग तज्ञ डॉ.विलास देशमुख, बालरोगतज्ञ डॉ.ज्‍योती चोकाककर, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. विशाल चोकाककर, डॉ. डी. वाय. पाटील कारखान्‍याचे सेक्रेटरी नंदू पाटील, शहाजी सुतार, आश्रमशाळेचे मुख्‍याध्‍यापक शशिकांत उगलमुगले, प्रकाश चौगले व तेजश्री मंडले ,
       प्राथमिक आरोग्‍य केंद्र गारीवडेचे आरोग्य सेवक  नियाज शेख,  सुनिल ठोंबरे ,गणेश गुरव, गणपत पडवळ,  कार्तीक सातपुते,  संजय करंगुटकर, लक्ष्मीदास दुधवाडकर 
, गटप्रर्वतक सौ . हेमा कांबळे ,आरोग्यसेविका वंदना पिसे ,मिता पवार , किरण खाडे , यासीन म्हालदार , दिपक मुंढे आदि उपस्थित होते .

पळसंबे : येथे आश्रमशाळेत व्‍हर्नेबल कॅम्‍पचे उद्घाटनप्रसंगी सभापती सौ.संगीता पाटील, उप‍सभापती पांडूरंग भोसले , वैद्यकीय अधिक्षक डॉ .विलास देशमुख व मान्यवर