कोल्हापूर न्यूज / अणदूर प्रतिनिधी रघुनाथ दळवी
गगनबावडा येथील परशुराम विद्यालयातील जवळपास ३५० विद्यार्थ्यांना कॉंझर्वेशन फौंडेशन ऑफ इंडिया या कोल्हापूर येथील संस्थेच्या वतीने स्वेटर वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रंगराव गोसावी होते.
यावेळी कॉंझर्वेशन फौंडेशन ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष आशिष घेवडे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना बालवयातच स्पर्धा परीक्षेची ठेवावी असे आवाहन केले. तसेच फौंडेशन च्या सदस्या डॉ अंजली पाटील यांनी विद्यार्थ्यांनी नोकरी करण्यापेक्षा स्वःताचा व्यवसाय करावा असे आवाहन केले. यावेळी फौंडेशनचे प्रा. संजय पठारे, गगनबावडा ग्रामपंचायत सरपंच सौ.मानसी कांबळे , उपसरपंच मुश्ताक वडगावे, वृंदा पाध्ये, विश्वनाथ पोतदार, गुरुनाथ कांबळे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वाती चौगले यांनी तर आभार सौ. पत्रावळे यांनी मानले.
गगनबावडा येथील परशुराम विद्यालयात कॉझर्वेशन फौडेशन च्या वतीने स्वेटर वाटप करताना मान्यवर .
(छायाचित्र - रघुनाथ दळवी)
