पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने रायचूर जिल्हा न्यायाधीशांचा निषेध

Kolhapur news
By -


       वकोल्हापूर न्यूज नेटवर्क

आथणी:- कर्नाटक राज्य पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने रायचूर जिल्हा न्यायालयामध्ये प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढल्याप्रकरणी रायचूर चे न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी. अशा आशयाच्या मागणीचे निवेदन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कर्नाटक राज्याच्या प्रदेशाध्यक्षा सौ. सविता बनसोडे ,कर्नाटक राज्याचे संपर्कप्रमुख स्वप्निल बनसोडे व कर्नाटक राज्याचे युवकचे प्रदेशाध्यक्ष लखन वायदंडे यांनी आथणीचे तहसीलदार कोमार यांना दिले आहे. 

         कर्नाटक राज्य पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने आथणीचे तहसीलदार कोमार यांना निवेदन देताना प्रदेशाध्यक्षा सौ. सविता बनसोडे ,प्रदेश संपर्कप्रमुख स्वप्निल बनसोडे, युवकचे प्रदेश अध्यक्ष लखन वायदंडे इत्यादी.